गावाविषयी माहिती
माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही
गोमघरगावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नाचणी,वरी,उडीद,तूर,कुळीथ पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा हा उत्सव कार्तिक सोहळा व गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्यगटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
गोमघरगावच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
तपशील संख्या पुरुष ७६० स्त्री ७०० एकूण १४६०
गोमघर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गोमघर गावात हनुमान जयंती व डोल्हारा गावा बाहेरिल प्राचिन काळातिल पांडवानी बांधलेली पाचकुंड भाविकांना आकर्षित करते.छोटिशी जत्रा भरते बघण्यासाठी बहुसंख्य लोक येतात.तसेच या गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी चैतावळी ला मरि आई च जागरण केला जातो. अनेक देवी – देवतांचे मुखवटे परिधान करून मिरवणूक काढली जाते हे एक आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व बोहाडा, हनुमान जयंती यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.यामुळे गोमघर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत मारुती मंदिर, शिवमंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रिला मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. सर्वलोकांना महाप्रसाद चा लाभ मिळतो .सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
शेती– डोल्हारा येथे भात,नाचणी व वरी उडिद,तुरउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील अनेक शेतकर्यांकडे आंबा, काजू च्या बागा आहेत त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात.
गोमघर या गाव तसेच मोखाडा तालुक्यातील पूर्वेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो.तसेच खोडाळा याठिकाणी आठवडी बाजार जोरात भरतो.